डोंबिवली दि.24 ऑक्टोबर :
दिपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने त्यानिमित्त युवासेनेतर्फे आज डोंबिवलीत महापूरुषांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कल्याण डोंबिवलीमध्ये ठिक ठिकाणी महापुरुषांचे स्मारक आणि पुतळे उभारण्यात आले आहेत. तर दिपावली सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीमध्ये सर्वच जण आपले घर आणि आपल्या परिसराची साफसफाई करीत असतो. त्याचप्रमाणे आपल्या शहरातील महापुरुषांचे पुतळे आणि स्मारक परिसरही स्वच्छ असला पाहीजे या उद्देशाने युवासेनेतर्फे ही संकल्पना आयोजित केल्याची माहिती युवासेना उपजिल्हाधिकारी आशु सिंह यांनी दिली. तसेच युवासेनेतर्फे यापूढेही महापुरुषांच्या स्मारक स्वच्छतेची जबाबदारी सांभाळली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.