डोंबिवली दि.16 जून :
श्री संत सावळाराम महाराज वनश्री धामटाण, भाल, दावडी, सोनारपाडा, उंबार्ली येथील वातावरण पक्ष्यांना पोषक आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध पक्ष्यांचा अधीवास असल्याने हे पक्षी अभयारण्य म्हणूनच हे ओळखले जात असून त्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. खासदार शिंदे यांनी आज या पक्षी अभयारण्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
उन्हाळ्यामध्ये येथील पक्ष्यांची तहान भागावी आणि त्यांना पाण्याची सोय होण्यासाठी या पक्षी अभयारण्यात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५ हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. आता पावसाळा सुरु झाला असून जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन करुन ते पाणी संवर्धन करण्याच्या दृष्टिने 2 बंधारे बांधण्याच्या तसेच अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यातून पाणी झिरपत असल्याने त्याची डागडूजी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तर या जागेवर अधिक वृक्ष लागवड करून येथील पक्षी आणि वृक्षांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून संरक्षक भिंत बांधण्याबाबतची सूचनाही त्यांनी यावेळी केली.