डोंबिवली दि.४ ऑक्टोबर :
उद्याच्या दसरा मेळव्यावरून राज्यातील राजकारणाला चांगलाच वेग आलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिकडे असतील त्याच दसरा मेळाव्याला गर्दी होणार असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी डोंबिवलीमध्ये बोलताना व्यक्त केली. अमृता फडणवीस यांनी काल डोंबिवलीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित रासरंग आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आयोजित रमो नमो या दोन्ही भव्य नवरात्रौत्सवाला भेट दिली.
तर बोलण्याचा अधिकार हा प्रत्येक राजकीय पक्षाला असून सर्व पक्ष तो बजावतील. आपल्याला सर्वांचे एकायचे आहे. मात्र प्रगतीचे राजकारण कोण करतंय हे समजून घेऊन पुढील वाटचाल करायची असल्याचे सूचक वक्तव्यही अमृता फडणवीस यांनी यावेळी केले.
दरम्यान डोंबिवलीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित रासरंग आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आयोजित रमो नमो या दोन्ही भव्य नवरात्रौत्सवाला त्यांनी भेट दिली. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.