‘ऑफबीट करिअर्स’च्या माध्यमातून केम्ब्रिया इंटरनॅशनल शाळा दाखवणार करिअरच्या नव्या वाटा
कल्याण दि.14 डिसेंबर :
नेहमीच आपल्या विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कल्याणातील केम्ब्रिया इंटरनॅशनल शाळेतर्फे 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘ऑफबीट करिअर्स’ या ऑनलाईन सेमिनारच्या माध्यमातून सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे 10 वीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या वाटा दाखवण्यात येणार आहे.
कोवीडमूळे आणि कोवीडनंतर जवळपास प्रत्येक क्षेत्रातील चित्र बदलून गेले आहे. त्यातच पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही योग्य करिअर निवडीबाबत प्रचंड गोंधळाचे वातावरण असून दोघांमधील ही अनिश्चितता दूर करण्याचा प्रयत्न ‘ऑफबीट करिअर्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या आयसीएससी, सीबीएसई अभ्यासक्रमातून शिक्षण घेणाऱ्या 10 वीच्या विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन करतील.
19 डिसेंबर 2021, 9 जानेवारी 2022 आणि 23 जानेवारी 2022 असे 3 दिवस होणाऱ्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे, मोटिवेशनल स्पीकर सिमरजीत सिंग आणि पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट स्टडीज बोर्डाचे सदस्य विवेक वेलणकर हे विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध नव्या पर्यायांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या करिअर सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी https://us02web.zoom.us/meeting/register/tZUucuqvrDsjHdN7w8BCXKmRy4LdKRhSwoQd या लिंकवर किंवा 89283 77762 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केम्ब्रिया इंटरनॅशनल शाळेतर्फे करण्यात आले आहे.