Home ठळक बातम्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा शाश्वत विकास साधणार – महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर...

कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा शाश्वत विकास साधणार – महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांची ग्वाही

कल्याण ग्रामीण दि.5 नोव्हेंबर :
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात कोणतेही विधायक काम झालेले दिसून येत नाही. मतदार संघातील प्रत्येक भागात पाणी, रस्ते यासारख्या मुलभूत सुविधा देखील होऊ शकल्या नाहीत. परंतू पुढील काळात कल्याण ग्रामीण मतदार संघामध्ये मुलभूत सुविधांसोबत पायाभूत सुविधा देखील पुरवून कल्याण ग्रामीण मतदार संघाचा शाश्वत विकास साधणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांनी चौकसभेवेळी सांगितले.

पिसवली येथे भव्य रॅलीची सांगता चौकसभेने करण्यात आली त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण ग्रामीण मतदार संघात अनेक समस्या गेल्या पाच वर्षात निर्माण झाल्या असून जनता जनार्दनाच्या आशीवार्दाने पुढील काळात सोडविणार असल्याचे सांगितले. त्यावेळी व्यासपीठावर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार जिल्हाध्यक्ष वंडारशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, तालुका प्रमुख मुकेश पाटील, सुखदेव पाटील, माजी सरपंच सुजाता पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बबिता राम, विभाग प्रमुख रघुनाथ माळी, कैलास भोईर, दिनेश शेठ भोईर, मारुती भोईर, मोहन किल्लेदार, नितीन भोईर, प्रमोद झेंडे आदि उपस्थित होते.

गोळवली समता नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून भव्य रॅलीची सुरवात करण्यात आली. त्यानंतर पांडुरंग वाडी, देशमुख होम, पिसवली गेट, पिसवली गाव, चेतना नगर पर्यंत प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅली मध्ये महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा