Home ठळक बातम्या विकसित भारत घडवायचाय, आई – बाबा तुम्ही मतदान केलेच पाहिजे; कल्याण डोंबिवलीतील...

विकसित भारत घडवायचाय, आई – बाबा तुम्ही मतदान केलेच पाहिजे; कल्याण डोंबिवलीतील शालेय विद्यार्थ्यांची पालकांना साद

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनोखी शक्कल

कल्याण डोंबिवली दि.12 मार्च :
“आमचे चांगले भवितव्य घडवायचे असेल, देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर आई बाबा तुम्ही येणाऱ्या निवडणूकीत मतदान केलेच पाहिजे “अशी गळ कल्याण डोंबिवलीतील शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना घालताना दिसत आहेत. निमित्त आहे ते अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांचे. (General election, loksabah election)

मतदानाचा टक्का वाढावण्यासाठी विद्यार्थ्यांनीच कसली कंबर…
कोणत्याही लोकशाही देशासाठी निवडणूक आणि मतदान प्रक्रियेचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. कारण देशातील प्रत्येक नागरीकाला मिळालेल्या या मतदानाच्या मूलभूत अधिकारातूनच देशाची भविष्यातील पायभरणी केली जाते. मात्र मतदान दिवस म्हटलं की सुट्टी असा काहीसा चुकीचा समज काही लोकांमध्ये गेल्या काही निवडणुकांमधून दिसून येत आहे. कारण नोंदणीकृत असणाऱ्या मतदरांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये मोठी तफावत जाणवते. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कल्याण डोंबिवलीतील शालेय विद्यार्थ्यांनीच कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक प्राथमिक शाळांतील हजारो विद्यार्थी या मतदान जागृती उपक्रमात सहभागी झाले आहेत.


हे सर्व शालेय विद्यार्थी “निवडणुकीत मतदान का केले पाहिजे”
या विषयावर पत्र लिहून त्याद्वारे मतदान केल्याने होणारे फायदे आणि न केल्याने होणारे तोटे नमूद करून आपल्या आई बाबांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करताना दिसत आहेत. तसेच आई बाबा तुम्ही मतदान केले तर आपला देश विकसित होईल, देश विकसित झाला तर माझेही भवितव्य चांगले होईल अशा शब्दांत हे शालेय विद्यार्थी आपल्या पालकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत असल्याची माहिती केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी विजय सरकटे यांनी दिली आहे.

दरम्यान गेल्या काही वर्षांतील सार्वत्रिक निवडणुका आणि त्यामध्ये झालेले मतदान पाहता कल्याण डोंबिवलीतील शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेला हा वसा निश्चितच कौतुकास्पद असून त्याचे सकारात्मक प्रतिसाद प्रतिसाद आगामी निवडणुकीत दिसतील अशी आशा आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा