Home कोरोना ‘कोरोनाशी लढायचे आणि जिंकायचेही आहे’ – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयातून...

‘कोरोनाशी लढायचे आणि जिंकायचेही आहे’ – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयातून साधला संवाद

 

ठाणे दि.20 एप्रिल :
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण सर्वांनी कोवीड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला कोरोनाशी लढायचेही आहे आणि जिंकायचेही आहे असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्यांदा कोवीड पॉझिटिव्ह झालेल्या खासदार शिंदे यांच्यावर गेल्या आठवड्यापासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्यांनी सोशल मिडियाद्वारे लोकांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.

सध्या कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा आरोग्य सुविधांवर मोठा ताण आला आहे. मात्र अशा परिस्थितीतही ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा लोकांच्या सेवेसाठी झटत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना बेड, ऑक्सिजन, इंजेक्शनची मोठी गरज भासत आहे. ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आपण सतत महापालिका आयुक्त आणि सीईओंच्या संपर्कात असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.
तर कोवीडला पूर्णपणे आळा घालण्यासाठी लोकांनी शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत कोवीडशी आपल्याला लढायचेही आहे आणि त्याला हरवायचेही आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे 2 महिन्यात दुसऱ्यांदा कोवीड पॉझिटिव्ह आले असून गेल्या वेळेपेक्षा यावेळी त्यांना कोवीडची उग्र लक्षणे जाणवू लागल्याने आठवड्याभरापासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्यांनी सोशल मिडियाद्वारे लोकांशी संवाद साधत काळजी घेण्याचे आवाहन केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा