Home ठळक बातम्या मूर्तीकरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध – माजी आमदार नरेंद्र पवार

मूर्तीकरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध – माजी आमदार नरेंद्र पवार

 

कल्याण दि.31 जानेवारी :
श्री गणेश मूर्तिकार सेवा संस्थेच्या माध्यमातून आणि केंद्रीय वस्त्रौद्योग मंत्रालयाच्या सौजन्याने कल्याण पश्चिमेत मूर्तिकार- कलावंतांसाठी आयोजित सिरॅमिक कला शिबीराचे उद्घाटन माजी आमदार आणि भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मूर्तिकार आणि कलावंत हे समाजातील महत्वाचे घटक आहेत, मूर्तिकारांनी गेली शेकडो वर्षे आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. मूर्तिकार एखादी मूर्ती घडवत असतो तेव्हा ती मूर्ती समाजाला चिरकाल दिशा आणि प्रेरणा देत असते. कलावंतही आपल्या कलेच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करत असतात. केवळ आनंद आणि हास्य फुलवण्याचेच काम नाही तर समाजाच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम कलाकार करत असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. तर शासनाने पी. ओ. पी. च्या मूर्तीवर बंदी आणली आहे, हे योग्यच असून, आपली मूर्तीकार संघटना त्याचे स्वागत करत आहे कौतुकास्पद आहे, छोटे छोटे कलाकार आणि मूर्तिकार यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मतही नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी पल्लवी जांभूळकर (सहाय्यक संचालक (A & C), वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार), कृष्णा चंदर (ज्युनिअर एक्सपोर्ट प्रमोशन ऑफिसर (EPCL) , श्रीगणेश मूर्तिकार सेवा संस्थेचे अध्यक्ष नरेश चव्हाण, सरचिटणीस हेमंत ईश्वाद, खजिनदार सुनिल गिरकर, गणेश हनमुखे आदी मूर्तिकार-कलावंत, पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा