Home क्राइम वॉच मुख्य जलवाहिनीतून पाणीचोरी ; तबेलाधारकांच्या 62 अनधिकृत नळ जोडण्या केडीएमसीकडून खंडीत

मुख्य जलवाहिनीतून पाणीचोरी ; तबेलाधारकांच्या 62 अनधिकृत नळ जोडण्या केडीएमसीकडून खंडीत

 

कल्याण दि.28 फेब्रुवारी :
कल्याण पश्चिमेतील तबेल्यावाल्यांकडून थेट केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फोडून पाणी चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. येथील दुर्गाडी किल्ला ते सर्वोदय सोसायटी परिसरात असलेल्या तबेला चालकांकडून मुख्य जलवाहिनीवर करण्यात आलेल्या तब्बल 62 अनधिकृत नळजोडण्या काल तोडण्यात आल्या आहेत.(water theft from the main aqueduct; of stable holders 62 unauthorized tap connections broken by KDMC)

अनधिकृत बांधकामांपाठोपाठ केडीएमसी प्रशासनाने आपला मोर्चा आता पाणीचोरी करणाऱ्यांकडे वळवला आहे. त्यानुसार केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार आणि शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कल्याण पश्चिमेतून कल्याण पूर्व विभागाला पाणी पुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी आहे. दुर्गाडी किल्ला ते सर्वोदय सोसायटी दरम्यान जाणाऱ्या या मुख्य जलवाहिनीवर इथल्या आजूबाजूच्या तबेलाधारकांनी बिनदिक्कतपणे अनधिकृत नळजोडण्या केल्याचे केडीएमसी प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात या अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्याची धडक कारवाई करण्यात आली.

ज्यामध्ये अर्धा इंच व्यासाच्या 3 नळजोडण्या, एक इंच व्यासाच्या 26 नळजोडण्या, दीड इंच व्यासाच्या 31 नळजोडण्या आणि दोन इंच व्यासाच्या 2 अशा एकुण 62 अनधिकृत जोडण्या खंडीत करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली.

तर पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, शैलेश मळेकर तसेच अ, ब, क, ड, जे आणि ह प्रभागातील उप अभियंता महेश डावरे, राजेश गोयल, किशोर भदाणे, उदय सुर्यव‍ंशी, कनिष्ठ अभियंता देवेंद्र एकंडे, सुनिल वाळंज, मयुर शिंदे, दयाराम पाटील आणि पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान या परिसरात याच पद्धतीने पाणी चोरीचा प्रकार यापूर्वीही उघड झाला होता. त्यामुळे या अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्यानंतरही त्या पुन्हा जोडल्या कशा जातात याकडेही केडीएमसी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा