Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी कल्याणातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार 9 तास बंद

येत्या मंगळवारी कल्याणातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार 9 तास बंद

 

कल्याण दि.19 एप्रिल :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथील अशुद्ध आणि शुद्ध पाण्याच्या मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. या कामासाठी येत्या मंगळवारी २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असा ९ तास पुढील भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली आहे. (Water supply to this area of ​​Kalyan will be cut off for 9 hours on Tuesday)

या भागांचा पाणी पुरवठा राहणार बंद…
केडीएमसीच्या मोहिली जलशुध्दीकरण केंद्रामधून महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण ग्रामीण विभाग म्हणजेच मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच इतर गावे, कल्याण पश्चिमेतील “ब” प्रभाग क्षेत्रातील मिलिंद नगर, योगिधाम, चिकण घर, बिर्ला कॉलेज परिसर, मुरबाड रोड परिसर या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचेही केडीएमसी पाणी पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा