
कल्याण दि.25 मार्च :
येत्या मंगळवारी 29 मार्च 2022 रोजी कल्याण पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा 12 तास बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.
बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि तांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.