कल्याण डोंबिवली दि.30 एप्रिल :
टाटा पॉवरच्या सबस्टेशनमधील फिडरच्या आणि बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीमुळे येत्या गुरुवारी 2 मे 2024 रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.(Water supply to Kalyan Dombivli will be shut on next Thursday, May 2)
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 150 दशलक्ष लिटर मोहीली उदंचन केंद्र आणि 100 दशलक्ष लिटर जलशुद्धीकरण केंद्राला महावितरणकडून टाटा पॉवरमार्फत वीज पुरवठा केला जातो. हा वीज पुरवठा केल्या जाणाऱ्या सबस्टेशनमधील फिडरच्या आणि बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
त्यामुळे येत्या गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आदी भागांसह डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आली.