
कल्याण डोंबिवली दि.१४ ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी बंद राहणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल दुरूस्ती कामांसाठी सकाळी ८ ते रात्री ८ असे बारा तास कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद असेल अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
केडीएमसीच्या बारावे, मोहीली, नेतीवली या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये ही देखभाल दुरूस्तीची कामे केली जाणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व – पश्चिम, वडवली – शहाड – टिटवाळा, डोंबिवली पूर्व – पश्चिम या भागांमधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.