Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी २६ एप्रिलला कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद

येत्या मंगळवारी २६ एप्रिलला कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद

 

कल्याण – डोंबिवली दि. २२ एप्रिल :
येत्या मंगळवारी २६ एप्रिल २०२२ रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार आहे. केडीएमसीच्या बारावे, मोहीली, नेतीवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

त्यामुळे २६ एप्रिल मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बारावे, मोहिली, नेतीवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पुर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली पुर्व – पश्चिमेचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा