कल्याण- डोंबिवली दि. 12 मे :
येत्या मंगळवारी 15 जून रोजी कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा 12 तास बंद राहणार आहे. बारावे जलशुद्धीकरण केंद्र, टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र, मोहिली उदंचन – जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी 15 जून 2021 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.