कल्याण- डोंबिवली दि. २० मे :
येत्या मंगळवारी २४ मे २०२२ रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहीली, नेतीवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
परिणामी २४ मे रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कल्याण पूर्व – कल्याण पश्चिम, ग्रामीण आणि डोंबिवली पूर्व – पश्चिम भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
नाही तरी गेले काही महिने , सागांव,वरचा पाडा ची जनता पाण्या वीणा तडफडत आहे,त्या मध्ये पाणी पुरवठा बंद करून काय नवल आहे,