कल्याण दि.6 ऑगस्ट :
बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील विद्यूत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्ती करण्यासाठी येत्या मंगळवारी 10 ऑगस्ट रोजी कल्याण पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.