Home ठळक बातम्या कल्याण ग्रामीणमधील पाणीप्रश्न लागणार मार्गी ; आमदार राजेश मोरे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह...

कल्याण ग्रामीणमधील पाणीप्रश्न लागणार मार्गी ; आमदार राजेश मोरे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह घेतली एमआयडीसी सीईओंची भेट

कल्याण ग्रामीण दि.12 डिसेंबर:
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे आणि २७ गावामधील नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीणचे नवनियुक्त आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज एमआयडीसी विभागाचे सीईओ आणि सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली. यावेळी इथल्या पाणी पाणी प्रश्नावर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर पी. वेलारासू यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे.(Water issue in Kalyan Rural; MLA Rajesh More along with Shiv Sena delegation met MIDC CEO)

या बैठकीत १४ गावं आणि २७ गावांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार पुढील कालावधीत अमृत योजनेचे काम वेगाने मार्गी लावण्याबरोबरच या भागासाठी स्वतंत्र पाणीकोटा मंजूर करत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन यावेळी पी. वेलारासू यांनी दिल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले.

कल्याण ग्रामीण मतदार संघातील १४ गावे आणि २७ गावामध्ये पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी टंकर चा आधार घ्यावा लागतो, निवडणूक प्रचारासाठी ग्रामीण भागात फिरताना आणि निवडणूक जिंकल्यानंतर ग्रामीण भागातील जनतेचे आभार मानताना मतदारांनी पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची विनंती आमदार मोरे यांना केली होती. नागरिकाचे या भागातील पाण्यासाठी होणारे हाल पाहून विचलित झालेल्या आमदार मोरे यांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते.

या पार्श्वभूमीवर आज ग्रामीण भागातील शिवसेना विधानसभा संघटक बंडूशेठ पाटील, ज्येष्ठ समाजसेवक व शिवसैनिक दत्ता वझे, उपतालुकाप्रमुख गणेश जेपाल, उपतालुकाप्रमुख विकास देसले, विभाग प्रमुख किसन जाधव, विभागप्रमुख अनिल म्हात्रे, हितेश गांधी यांच्या शिष्टमंडळासह आमदार मोरे यांनी एम आयडीसीच्या सीईओची भेट घेतली.

यावेळी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत याची सविस्तर माहिती घेतानाच नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सुरु असलेल्या योजनांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्या बरोबरच या भागातील वाढणाऱ्या लोकसंख्येची गरज म्हणून या भागातील पाणी कोटा वाढविण्याची मागणी मोरे यांनी केली. विशेष म्हणजे एम आयडीसीचे सीईओ पी वेलारासू यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या भागातील नागरिकांचा अनेक वर्षापासून सुरु असलेला पाणी प्रश्नकायम स्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान आमदार राजेश मोरे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली ही तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासादेणारी ठरणार असून लवकरच नागरिकाची पाणी प्रश्नातून सुटका होऊ शकणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा