ज्येष्ठ नगरसेवक बाळा म्हात्रे, कविताताई म्हात्रे भावाची तर युवक अनमोल म्हात्रे वडिलांची प्रथा चालवत असल्याचा आनंद
डोंबिवली दि.23 ऑक्टोबर :
शहरातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व आणि आमचे सहकारी स्व.वामन म्हात्रे यांच्या दूरदृष्टीतून दरवर्षी आपल्या डोंबिवली शहरात भाऊबीज हा कार्यक्रम 20 वर्षांपासून आयोजित करण्यात येतो. त्या उपक्रमात एक भाऊ म्हणून मला अनेक वर्षे आवर्जून बोलावण्यात येते, मीही जातोच, यंदाही तिथे गेलो, आणि शेकडो माता भगिनींनी मला भरभरून आशीर्वाद दिल्याने खूप काही करायचे आहे अशी भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे आणि भाऊ गोरखनाथ(बाळा) म्हात्रे यांनी वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या माध्यमातून ही प्रथा सुरू ठेवली आहे. त्या सोहळ्याला उपस्थित राहून वामन म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी डोंबिवलीतील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्या सगळ्यांनी रवि दादा आगे बढो… च्या घोषणा देऊन आम्हा सगळ्यांना जाहीर पाठिंबा दिला. वर्षानुवर्षे माझे त्या सगळ्यांशी ऋणानुबंध आहेत, मला त्या सगळयांबद्दल आपलेपणा वाटत असल्याची भावना मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली.