डोंबिवली दि.12 नोव्हेंबर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांसह सर्वच मोठे नेते हे देशाच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. राष्ट्र पुढे नेण्यासाठी आपल्यासारखे हजारो हात गरजेचे असून सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. (Vote for Grand Alliance for Nationality – Minister Ravindra Chavan’s appeal to dignitaries from various fields)
डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या एकत्रीकरण उपक्रमात नामांकित बिल्डर्स, डॉक्टर्स, आर्किटेक, सीए, पत्रकार, वकील, फार्मासिस्ट, शिक्षक यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. डोंबिवली जिमखान्याचे पर्णाद मोकाशी, सचिन चिटणीस यांनी त्या एकत्रिकरणाचे आयोजन केले होते.
यामध्ये डॉ. मिलींद शिरोडकर, आर्किटेक्ट केशव चिकोडी, निवृत्त मेजर विनय देगावकर, बांधकाम व्यावसायिक माधव सिंग, ओंकार दाहोत्रे, राजन मराठे, राहुल दामले, विश्वदीप पवार, मंदार हळबे, नवरे, निलेश वाणी, समीर चिटणीस यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तर राष्ट्रीय कर्तव्य समजून सगळ्यांनी अधिकाधिक संख्येने मतदान करून सहकार्य करावे. गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारकडून तब्बल अडीच हजारांहून अधिक निर्णय घेण्यात असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात व्याख्यात्या प्राची गडकरी यांनी केले.