Home ठळक बातम्या पक्षशिस्तीचा भंग ; शिवसेनेकडून महेश गायकवाड तर भाजपकडून वरुण पाटील यांच्यावर कारवाई

पक्षशिस्तीचा भंग ; शिवसेनेकडून महेश गायकवाड तर भाजपकडून वरुण पाटील यांच्यावर कारवाई

कल्याण दि.6 नोव्हेंबर :
पक्ष श्रेष्ठींनी आदेश देऊनही आपापले अर्ज मागे न घेता बंडखोरी कायम ठेवल्याप्रकरणी अखेर शिवसेना आणि भाजपने कल्याणातील बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवसेनेकडून कल्याण पूर्वेतील बंडखोर उमेदवार महेश गायकवाड यांच्यासह दहा जणांवर तर भाजपकडून कल्याण पश्चिमेतील भाजपचे बंडखोर उमेदवार वरुण पाटील यांच्यावर कारवाई केली आहे. यासंदर्भात काल रात्री दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये ही कारवाईची माहिती दिली आहे.

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षाच्या विरोधात काम करणे, पक्षादेशाचे पालन न केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी महेश गायकवाड, विशाल पावशे यांच्यासह दहा जणांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे लेखी आदेश दिले आहेत.

तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी भाजप पक्षश्रेष्ठींनी वरुण पाटील यांच्यावर 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांनी याप्रकरणी आदेश जारी करत हा निर्णय तात्काळ लागू करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा