कल्याण-डोंबिवली दि.6 एप्रिल :
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नविन कोवीड निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीमध्ये डी मार्ट आणि 2 वाईन शॉपच्या दुकानांसह 17 दुकाने आज सील करण्यात आली आहे. केडीएमसीच्या विविध प्रभागांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
कल्याण डोंबिवलीत वाढत्या कोवीड निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकाने सील करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी दिला होता. त्यानूसार ब प्रभागात 6, क प्रभागात 2 मॅरेज लॉन्स, फ प्रभागात 5, ग प्रभागात 3, ई प्रभागक्षेत्रात डी-मार्टसह 2 वाईन शॉप सील करण्याची धडक कारवाई करण्यात आली. 30 एप्रिलपर्यंत ही दुकाने सील करण्यात आल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.