Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेतील विविध मुद्दे : युवानेते वैभव भोईर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र...

कल्याण पश्चिमेतील विविध मुद्दे : युवानेते वैभव भोईर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद

कल्याण दि.20 मार्च :
कल्याण पश्चिमेतील विविध सामाजिक मुद्द्यांबाबत शिवसेनेचे युवानेते वैभव विश्वनाथ भोईर यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ज्यामध्ये आरोग्य सेवा, सांस्कृतिक, पायाभूत सुविधा, क्रीडा, पर्यटन, शहर सौंदर्यीकरण अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती भोईर यांनी दिली आहे. (Various issues in Kalyan West: Youth leader Vaibhav Bhoir meets Chief Minister Devendra Fadnavis)

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यामध्ये कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाण्यासारखा विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत आहे. तर दुसरीकडे युवानेते वैभव भोईर हेदेखील कल्याण पश्चिमेतील नागरी आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विविध मुद्दे त्यांच्यासमोर मांडले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा