Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्या (18 जून) 15 केंद्रांवर होणार लसीकरण

कल्याण डोंबिवलीत उद्या (18 जून) 15 केंद्रांवर होणार लसीकरण

 

कल्याण-डोंबिवली दि.17 जून :
कल्याण डोंबिवलीत उद्याही (18जून ) 15 ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह याठिकाणी 18 वर्षे आणि त्यावरील दिव्यांगांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. तर परदेशी जाणाऱ्या नागरिकांना कोविशील्डचा 2 रा डोस देण्याच्या सुविधेचा उद्या अंतिम दिवस आहे.

याठिकाणी मिळणार कोव्हॅक्सीनचा केवळ 2 रा डोस…

प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व) महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व) याठिकाणी “कोव्हॅक्सीन लसीचा केवळ 2 रा डोस” दिला जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून लस साठा उपलब्ध असेपर्यंत ही केंद्र सुरू राहणार आहेत.

दिव्यांग व्यक्तींसाठी याठिकाणी सुविधा…
तर कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे 18 वर्षे आणि त्यावरील दिव्यांगांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हे लसीकरण सुरू होणार असून दिव्यांग नागरिकांनी युडीआयडी कार्ड किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून मिळालेले दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान ओळखपत्र इ. कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

परदेशी जाणाऱ्या नागरिकांच्या लसीकरण सुविधेचा उद्या (18 जून)  अंतिम दिवस

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातून परदेशी जाणा-या नागरिकांच्या कोविशिल्डच्या 2ऱ्या डोस सुविधेचा उद्या अंतिम दिवस आहे. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ही विशेष सुविधा आहे. कोविशिल्ड लसीचा 1 ला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झाले आहेत परंतू 84 दिवसांपेक्षा कमी कालावधी असणाऱ्या व्यक्तींना याठिकाणी लस दिली जाणार आहे. परदेशी जाणाऱ्या 18 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील सर्व नागरिकांना हा 2 रा डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली. सकाळी 10 ते लस साठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे.
याठिकाणी लस घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी पासपोर्ट, व्हिसा, अँडमिशन लेटर, नेमणुकीचे पत्र, अँड्रेस प्रूफ या आवश्यक कागदपत्रांच्या मूळ तसेच छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या छायांकित प्रती (झेरॉक्स कॉपी) पडताळणी केल्यानंतर जमा करून घेतल्या जाणार असल्याचेही केडीएमसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही केंद्र वगळता उर्वरित केंद्रांवर हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांचे सकाळी 10 वाजल्यापासून लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. याठिकाणी कोवीशिल्ड लसीचा 1 ला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा