डोंबिवली, दि.28 जून :
शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आणि रोटरी क्लब ऑफ सनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अंध व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदतही करण्यात आली.
डोंबिवली पूर्वेच्या दत्तनगर शिवमंदिर येथील ज्ञानेश्वर हिंदी हायस्कुल लसीकरण केंद्रावर वांगणी ,कर्जत, कल्याण,बदलापूर, आणि डोंबिवलीतील 59 अंध व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तीला लस मिळायलाच हवी या उद्देशाने ही लसीकरण मोहीम घेण्यात आली. शिवसेना नेहमीच समाजकार्य करते असते, त्याचाच एक भाग म्हणून अंध-अपंगांसाठी कोणतीही गर्दी न करता त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवल्याचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले. यावेळी मोरे यांच्यासह महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ अर्ध्वर्यू गौडकर , उपअभियंता रोहीणी लोकरे, रोटरी क्लबचे निशांत व्यास, लक्ष्मी शर्मा, विभागप्रमुख किरण पाटील, अनिल माळी, सागर जेधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.