कल्याण – डोंबिवली दि.27 ऑगस्ट :
केडीएमसीतर्फे उद्या 28 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवलीमध्ये
23 ठिकाणी कोवीड लसीकरण केले जाणार आहे. त्यापैकी आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.) आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.) या 2 ठिकाणी ‘कोविशिल्ड’ लसीचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही लसीकरण केंद्रांवर टोकनशिवाय लस दिली जाणार आहे. संबंधित दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्राची छायांकित प्रत जवळ बाळगणे आवश्यक आहे.
तर आर्ट गॅलरी, लाल चौकी ,कल्याण(प) आणि सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली येथे कोवॅक्सिन लसीचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे. ही 4 केंद्र वगळता उर्वरित लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा 1ला आणि 2 रा डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.
या लसीकरणासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होतील. तसेच ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्याकरिता, आधार कार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.
1 Dose