कल्याण-डोंबिवली दि.13 जून :
कल्याण डोंबिवलीत उद्या (14 जून ) 21 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून त्यापैकी 3 केंद्रांवर हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्ससह 18 वर्षांवरील नागरिकांनाही कोव्हॅक्सीनचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे. तर उर्वरित 18 केंद्रांवर हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्ससह 45 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा 1ला आणि 2 रा डोस दिला जाणार आहे. त्यापैकी एका केंद्रावर परदेशी जाणाऱ्या 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे.
उद्या प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व) महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व) याठिकाणी “कोव्हॅक्सीन लसीचा केवळ 2 रा डोस” दिला जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत हे लसीकरण केलं जाणार आहे.
तर उर्वरित 19 केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा 1ला आणि 2 रा डोस दिला जाणार आहे. याठिकाणी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांचे सकाळी 10 वाजल्यापासून लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. त्याशिवाय कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील आर्ट गॅलरी केंद्रांवर परदेशी जाणाऱ्या 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परदेशी शिक्षणासंदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची पाहणी करूनच ही लस दिली जाणार असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केले आहे.