
कल्याण – डोंबिवली दि.26 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात केडीएमसीतर्फे उद्या 21 ठिकाणी लस दिली जाणार आहे. या 21 पैकी एका ठिकाणी कोवॅक्सीनचा 2 रा तर उर्वरित 20 ठिकाणी कोवीशिल्ड लसीचा 2 रा डोस दिला जाणार आहे.
या लसीकरणासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार असून ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधार कार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.