‘
कल्याण दि.13 एप्रिल :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजेच विद्वत्तेचे प्रतिक म्हणूनही पाहिले जाते. या पार्श्वभमीवर कल्याण पूर्वेमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या पुढाकाराने तब्बल 2 हजार 51 वह्यांच्या माध्यमातून सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारली आहे. या प्रतिकृतीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आगळी वेगळी मानवंदना देण्यात आली आहे.
कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग कार्यालयाशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीतर्फे साजरा केला जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी तब्बल 660 चौरस फूटाच्या जागेवर 2 हजार 51 वह्यांचा वापर करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांनी पुढाकार घेत हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. तर रुपेश गायकवाड, श्री माकम आणि रोहन जगताप यांची ही संकल्पना आहे. तर कल्याण पुर्व बासरीवाला आधुनिक ढोल ताशा पथकाच्या सदस्यांनी ही कलाकृती साकारली आहे. याच पथकाने शिवजयंतीच्या दिवशी 5 हजार वृक्षरोपांच्या माध्यमातून महाराजांची प्रतिमा साकारली होती. त्यापाठोपाठ आता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी ही अनोखी प्रतिकृती साकारल्याचे यावेळी सांगण्यात आले.