कल्याण दि.2 मे :
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कल्याणात अनोखे ‘ऑनलाईन चित्रकला प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते. कल्याणातील वेदांत आर्ट अकादमीतर्फे आयोजित या ऑनलाईन प्रदर्शनात अनेक मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपली कला सादर केली. (‘Unique Online Painting Exhibition’ held in Kalyan on the occasion of Maharashtra Day)
सध्या कोरोनामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे. त्यातच विद्यार्थ्यांचा सुट्टी काळ सुरू असून विद्यार्थीही घरात बसून कंटाळले आहेत. आपल्यातील कलाकृती बाहेर सादर करता येत नाही. या पार्श्वभूमीवर कला शिक्षक यश महाजन आणि त्यांच्या पत्नी भावना महाजन दांम्पत्याने ही ऑनलाईन चित्रकला प्रदर्शनाची संकल्पना राबवल्याचे एलएनएनला सांगितले. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलाकृती इतरांसमोर सादर करण्यासह इतर कलाकारांची चित्रकृतीतून नविन काही तरी शिकण्याची संधी मिळेल हा या संकल्पनेमागचा प्रमूख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या ऑनलाईन चित्रकला प्रदर्शनात
मौलिक, लतिका शेट्टी, पल्लवी कोव्हाड, मृणाल कोल्हे, निर्मय, हर्षिता गावात, ऋतुजा कथ्थापुरकर, जोयदीप नंदी, स्मिती मुखर्जी श्रद्धा, संस्कृती, यश महाजन आदी 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या मुलांनी त्यांच्याकडे उपलब्ध साहित्यातून आपली कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केला. हे चित्र प्रदर्शन यु ट्यूब, फेसबुक, टेलिग्राम आदी माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहे.