कल्याण दि.३ ऑक्टोबर :
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचे आज एका घटनेवरून दर्शन घडले. आपल्या शासकीय दौऱ्यानिमित प्रवास करत असताना आपला ताफा थांबवून रस्ते अपघातातील जखमींना मदत केली. एवढेच नव्हे तर या घटनेतील अपघातग्रस्ताला आपल्या ताफ्यातील एका गाडीमध्ये बसवत रुग्णालयातही पाठवले. (Union Minister of State Kapil Patil stopped the convoy and admitted the accident victim to the hospital)
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आज मुरबाड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी बापसई येथून त्यांचा ताफा चालला असताना पाटील यांना त्याठिकाणी टेम्पोला अपघात झाल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ आपली गाडी थांबवून जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. तसेच या अपघातात जखमी झालेले टेम्पोचालक सोमनाथ गवाळे यांना ताफ्यातील गाडीत बसवून मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करत गवाळे यांच्यावर अद्ययावत उपचार करण्याची डॉक्टरांना सुचनाही केली. तसेच जखमी सोमनाथ गवाळे यांची विचारपूस करून दिलासा दिला.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे चांगलेच कौतुक होत आहे.
Hats Off to
Kapil Patil Sir
Always humble & humane
Wins Hearts