
मुंबई दि.15 एप्रिल:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी यावेळी आभार मानले. तसेच राज ठाकरे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या रणनीतीबद्दल चर्चा झाली. ज्यामध्ये राज ठाकरे यांनी कपिल पाटील यांना काही सूचना केल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मनसेचे आमदार प्रमोद पाटील, अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि डी. के. म्हात्रे आदी उपस्थित होते.