
कल्याण दि.4 मार्च :
कल्याणच्या रेतीबंदर खाडी परिसरामध्ये बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या बोटी आणि सेक्शन पंप कल्याणच्या तहसिलदारांनी कारवाई करून नष्ट केले. सोमवारी दुपारच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.(Unauthorized sand extraction in Kalyan bay; 4 barges and suction pumps destroyed in Tehsil department action)
कल्याणच्या खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे रेती उपसा सुरू असल्याच्या तक्रारी कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडे वारंवार येत होत्या. या तक्रारीची दखल घेत शेजळ यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन करणाऱ्या सेक्शन पंप आणि बार्जवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काल दुपारी कल्याण मंडळ अधिकारी आणि नडगाव मंडळ अधिकारी यांनी
कल्याण रेतीबंदर ते गांधारी ब्रिजपर्यंतच्या खाडी पात्रामध्ये बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन करण्याच्या उद्देशाने उभे असलेल्या चार बार्ज आणि पाच सक्शन पंप असलेल्या बोटींवर धडक कारवाई केली.
दरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच बार्ज आणि पडावावरील मजुरांनी खाडीपात्रात उडी मारून विरुद्ध दिशेने पळून गेले. अखेर अधिकाऱ्यांनी एकूण 4 पडाव आणि पाच सक्षम पंप जप्त करत त्यातील दोन नदीपात्रात बुडवून दिले आणि उर्वरित दोन बार्ज आणि पाच सक्षम पंप जाळून नष्ट केले अशी माहिती कल्याण मंडळ अधिकारी दीपक गायकवाड यांनी दिली आहे.