Home ठळक बातम्या रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि केडीएमसीच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड मोहीम

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि केडीएमसीच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड मोहीम

 

कल्याण दि.12 जुलै :
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि केडीएमसीच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून वृक्षसंख्येच्या वाढीसाठी उपक्रम आयोजित करण्यात आला.

“सध्या कोविड च्या काळात ऑक्सिजन किती गरजेचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी झाडे लावून वसुंधरेचे ऋण आपण फेडले पाहिजे” असे मत केडीएमसी अधिकारी मिलिंद गायकवाड यांनी व्यक्त केले. तर रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे येत्या काळात ‘वृक्ष लागवड व संवर्धन’ या त्रैवार्षिक प्रकल्पाअंतर्गत विविध देशी वृक्षांची लागवड आणि पुढील ३ वर्षें संगोपन करण्यात येणार आहे. तसेच बटरफ्लाय गार्डन, बसण्यासाठी बाकडेही टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष नितीन माचकर यांनी दिली.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अनेक सदस्य, केडीएमसीचे मिलिंद गायकवाड, नवांगुळ, जगताप यांच्यासह कल्याण शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत सुमारे ५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा