
कल्याण दि.24 जुलै:
नवी मुंबईहून कल्याण कडे येणारी एन एम एम टी म्हणजेच नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेची बस बंद पडल्याने पत्रीपूल परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या आई तिसाई देवी उड्डाणपुलाच्या तोंडावरच ही बस बंद पडली आहे. ऐन सकाळच्या वेळेस ही वाहतूक कोंडी झाल्याने कामावर जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर ही बस बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून टाटा पॉवर पर्यंत ही वाहनांची पोचल्याचे स्थानिकांनी सांगितले.
फोटो माहिती सौजन्य: संजीव चौधरी, एल एन एन सिटीजन रिपोर्टर