Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात एकूण 56.05 टक्के मतदान ;. कल्याण डोंबिवलीतील मतदारसंघांची...

ठाणे जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात एकूण 56.05 टक्के मतदान ;. कल्याण डोंबिवलीतील मतदारसंघांची अशी आहे आकडेवारी

ठाणे, दि. 21 नोव्हेंबर :
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठीचे मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडले. ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ असून या सर्व विधानसभा मतदारसंघातून एकूण 56.05 टक्के मतदान झाले असल्याचे माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. (Total 56.05 percent voting in Thane District Assembly Constituency;. These are the statistics of constituencies in Kalyan Dombivli)

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघनिहाय टक्केवारी
134 भिवंडी ग्रामीण – 69.01
135 शहापूर अ.ज – 68.32
136 भिवंडी पश्चिम – 54.1
137 भिवंडी पूर्व – 49.2
138 कल्याण पश्चिम – 54.75
139 मुरबाड – 64.92
140 अंबरनाथ – 47.75
141 उल्हासनगर – 54
142 कल्याण पूर्व – 58.50
143 डोंबिवली – 56.19
144 कल्याण ग्रामीण – 57.81
145 मिरा भाईंदर – 51.76
146ओवळा माजिवडा – 52.25
147 कोपरी पाचपाखाडी – 59.85
148 ठाणे – 59.01
149 मुंब्रा कळवा – 52.01
150 ऐरोली – 51.5
151 बेलापूर – 55.24
आजच्या मतदानाच्या या राष्ट्रीय कार्यात अमूल्य योगदान दिलेल्या सर्व मतदारांचे, सर्व राजकीय पक्षांचे त्यांच्या प्रतिनिधींचे, सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांचे,अधिकारी-कर्मचाऱ्यांचे, पोलीस विभागाचे, शिक्षकांचे, विशेषतः महिलांचे आणि प्रसार माध्यम प्रतिनिधींचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी विशेष आभार मानले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा