Home ठळक बातम्या एनडीआरएफच्या टिमकडून कल्याण खाडीमध्ये थरारक सराव

एनडीआरएफच्या टिमकडून कल्याण खाडीमध्ये थरारक सराव

 

कल्याण दि. 12 जुलै :
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत दाखल झालेल्या एनडीआरएफ च्या टीमकडून भर पावसात कल्याणच्या खाडीमध्ये थरारक असा सराव करण्यात आला. एनडीआरएफ च्या पथकाने दोन रबरी बचाव बोटीच्या सहाय्याने कल्याण चा खाडी परिसर पिंजून काढत या भागाची पाहणी केली. (Thrilling practice in Kalyan creek by NDRF team)

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत डी आर एफ चे पथक दोन दिवसांपूर्वी दाखल झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून या पथकाकडून कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील सखल भागांची पाहणी केली जात आहे. तर आज या पथकाकडून कल्याणच्या खाडीपात्रात उतरत आजूबाजूचा भाग पिंजून काढण्यात आला. या टीमचे लीडर राजेश यावले यांच्या नेतृत्वाखाली दोन बोटी आणि बारा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण खाडीची आणि त्याला लागून असणाऱ्या परिसराची पाहणी करत सराव करण्यात आला.

साधारणपणे चार वाजल्यापासून सुरू झालेला हा सराव तब्बल दोन तास म्हणजेच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता. यामध्ये कल्याण खाडी किनारा, रेतीबंदर, वाडेघर या भागापर्यंत या रबरी बोटी नेऊन एनडीआरएफ कडून पाहणी करण्यात आली. आगामी काळात कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या भागात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही ती हाताळण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. या परिस्थितीतून लोकांची सुटका करण्यासाठी किंवा बचाव कार्य राबवण्यासाठी लागणारी सर्व सामग्री आणि यंत्रणा आमच्याकडे उपलब्ध असल्याची माहिती टीम लीडर प्रकाश यावले यांनी एलएनएनशी बोलताना दिली. विशेष म्हणजे भर पावसातही न थांबता या टीम कडून आपला सराव करण्यात आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा