Home ठळक बातम्या एन्चॅटेड एस्केपेड थीमने उजळून निघाला यंदाचा आंतरमहाविद्यालयीन ‘बिर्लोत्सव’; 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा...

एन्चॅटेड एस्केपेड थीमने उजळून निघाला यंदाचा आंतरमहाविद्यालयीन ‘बिर्लोत्सव’; 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

40 शिक्षण संस्थांच्या 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

कल्याण दि.8 फेब्रुवारी :
केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर मुंबई परिसरातील नामांकित महाविद्यालयांतील प्रमूख उत्सवांपैकी एक समजला जाणारा यंदाचा बिर्ला फेस्ट अर्थातच बिर्लोत्सव काहीसा वेगळा ठरला. एन्चॅटेड एस्केपॅड थीमवर (a magical adventure that is full of excitement and wonder) आधारित असलेल्या या बिर्लोत्सवमध्ये मुंबई विद्यापीठाशी संलग्न 40 शिक्षण संस्थांमधील तब्बल 5 हजार कलाप्रेमी विद्यार्थी सहभागी झाले होते. (This year’s inter-college ‘Birlotsav’ lit up with Enchanted Escapade theme; More than 5 thousand students participated)

 

या बिर्लोत्सवमध्ये गायन, फॅशन शो, ग्रुप आणि सोलो डान्स, मॉन्टेज, टी-शर्ट पेंटिंग, एकपात्री-अभिनय, लोकनृत्य अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. ज्यात मुंबईतील नामांकित हिंदुजा कॉलेज, जय हिंद कॉलेज, सोमय्या कॉलेज, एल्फिन्स्टन कॉलेज, रुपारेल कॉलेज आणि खालसा कॉलेज अशा प्रथितयश शैक्षणिक संस्थांमधील कलाप्रेमी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम आदित्य बिर्ला-ग्रासिम इंडस्ट्रीजने प्रायोजित केला होता.

प्रसिद्ध हिंदी आणि मराठी मालिका अभिनेत्री आणि महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा वाघ हिच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बिर्ला कॉलेजचे संचालक (शिक्षण) डॉ.नरेशचंद्र, प्राचार्य डॉ.अविनाश पाटील आदी मान्यवरांनी उपस्थितांना प्रोत्साहन देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.

 

तर दिवसभर चाललेल्या स्पर्धांनंतर या कार्यक्रमाचा समारोप तितक्याच दिमाखात संपन्न झाला. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना सुमारे 4 लाख रुपयांची पारितोषिक रक्कम प्रदान करण्यात आली. याप्रसंगी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ.आर.चितलांगे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान प्रसिद्ध हिंदी गायक शिवम चौहान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या बिर्लोत्सवमध्ये सादर केलेल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कला मंडळाच्या अध्यक्षा आकांक्षा ठाकूर आणि महाविद्यालयातील कला मंडळ आणि इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मल्टीमीडिया आणि जनसंवाद विभागाचे विद्यार्थी निखिल कुमार आणि अंकिता सिंग यांनी सूत्रसंचालन केले. तर व्यवस्थापन अभ्यास विभागाचे सहाय्यक प्रा. अरनॉल्ड जथाना, आणि संगणक शास्त्र विभागाचे सहाय्यक प्रा. आकाश कांबळे यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा