Home ठळक बातम्या लोकांच्या मनात जे आहे तेच हे सरकार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकांच्या मनात जे आहे तेच हे सरकार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवलीतील रासरंग कार्यक्रमाला उपस्थिती

डोंबिवली दि.23 ऑक्टोबर :
राज्यामध्ये लोकांचे म्हणणे ऐकणारे सरकार आहे. म्हणूनच गरबा आणि दांडियाला शेवटचे 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली असून तुमच्या मनामध्ये जे आहे तेच हे सरकार करेल असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde)यांनी केले. डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे (mp Dr. Shrikant shinde foundation) आयोजित रासरंग कार्यक्रमाला मुख्यमंत्री रविवारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठया संख्येने जमलेल्या सर्व गरबा रसिकांशी संवाद साधला. (This government will do what is in the mind of the people – Chief Minister Eknath Shinde)

पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत बाळासाहेबांचे स्वप्न…

आमचे सरकार आल्यापासून सर्व सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे होत आहेत. याआधी नवरात्रौत्सवाला एकच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवागी होती. आमचे सरकार आल्यानंतर 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत उत्सव साजरा करण्यात येत आहे. तर आपण जिथे जिथे जात आहोत तिथे तिथे जय श्रीराम गाण्याचे लोकांमध्ये वेड दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Naredra Modi) अयोध्येत राम मंदिर बांधत आहेत, लाखो करोडो रामभक्तांचे स्वप्न साकार होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीही अयोध्येत राम मंदिर बनावे हे स्वप्न बघितले होते. जे पंतप्रधान मोदी पूर्ण करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगताच जय श्री रामाच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.

सिने कलावंतांचा जल्लोष –
रासरंग – २०२३ कार्यक्रमाच्या आठव्या दिवशी रविवारी गरबा रसिकांचा उत्साह अगदी शिगेला होता. नैतिक नागदा यांच्या संगीतावर थिरकण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. या सर्व गरबा रसिकांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी आणि त्यांच्या समवेत नवरात्र उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेते टायगर श्रॉफ, जॅकी भगनानी यांनी उत्सवाच्या सुरुवातील हजेरी लावली. यावेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या ‘ गनपत ‘ या नवीन चित्रपटातील विविध गाण्यांवर ठेका धरला तसेच यावेळी उपस्थित गरबा रसिकांसमवेतही नृत्याचा आनंद घेतला. गरबा रसिकांचा जल्लोष शिगेला पोहोचलेला असतानाचा हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते तुषार कपूर यांनी रासरंग कार्यक्रमाला हजेरी लावताच सर्वांनी एकच जल्लोष केला. तुषार कपूर यांनीही आपल्या खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी देखील उत्सवाला उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला. यानंतर आपल्या दमदार अभिनयाने आणि आवाजाने हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मराठमोळा अभिनेता शरद केळकर यांनीही उत्सवाला भेट दिली. यावेळी रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी आपल्या दमदार आवाजात त्यांचे सुप्रसिध्द डायलॉग बोलून दाखवत आणि गाण्यांवर ठेका धरत सर्व रसिकांची मने जिंकली तर स्वतः गाणी म्हणत नैतिक नागदा यांना साथ केली. सुप्रसिध्द अभिनेते विजय वर्मा यांनी ही उत्सवाला हजेरी लावत ढोल पथकाच्या तालावर ठेका धरला.

सन्मान नवदुर्गांचा…
डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित रासरंग – २०२३ उत्सवाच्या अष्टमीच्या दिवशी स्त्री शक्तीचा सन्मान करत नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांमध्ये मराठी भाषेचा वापर अधिक होण्यासाठी अधिकृतरित्या काम करणारी अनुश्री पवार आणि अगदी लहान वयापासूनच आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत नावलौकिक कमावणाऱ्या आणि विविध पुरस्काराने सन्मानित केतकी कुलकर्णी यांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर विनिता राणे यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा