
कल्याण डोंबिवली दि 8 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी (11 नोव्हेंबर 2022) 9 तास बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवलीतील महापालिकेच्या जल शुद्धीकरण आणि उदंचन केंद्रांत इलेक्ट्रिक फिडरच्या दुरुस्तीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली आहे.
परिणामी कल्याण पूर्व – कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीणसह डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी बंद राहणार आहे.