Home ठळक बातम्या केडीएमसी बजेटमध्ये कोणतीही करवाढ नाही; चांगल्या नागरी सेवा- सुविधांसाठी यंदा अनेक “संकल्प”

केडीएमसी बजेटमध्ये कोणतीही करवाढ नाही; चांगल्या नागरी सेवा- सुविधांसाठी यंदा अनेक “संकल्प”

अनधिकृत बांधकाम, पाणीचोरांना आळा घालण्यासाठी जबर आर्थिक भुर्दंड

कल्याण डोंबिवली दि.20 मार्च :
प्रामाणिक करदात्यांसाठी कोणतीही करवाढ नसलेला आणि शहरातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सोयी – सुविधा देण्याचा “संकल्प” असणारा केडीएमसीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी आज 3 हजार 361 कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना शहरातील रस्ते – ड्रेनेज लाईन्ससारख्या पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, कचरा व्यवस्थापन, उद्याने – मैदाने, स्मार्ट ई – गव्हर्नन्सचे बळकटीकरण, वायू प्रदूषण, महापालिका शाळांचे अत्याधुनिकीकरण, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर, परिवहन सेवा यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांसाठी मोठी आर्थिक तरतूद केल्याचे स्पष्ट केले. (There is no tax hike in the KDMC budget; Many “resolutions” this year for better civic services and facilities)

तर शहरांचे नियोजन बिघडवणाऱ्या अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत नळ जोडण्यांसह यंदा प्रथमच अनधिकृतपणे ड्रेनेज लाईन टाकणाऱ्या व्यक्तींवर जबर आर्थिक दंड आकारण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. यंदापासून अनधिकृत बांधकामांना कर आकारणी करणे बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने अनधिकृत बांधकामांबाबत निर्देश जारी केले असून अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 10 पट दंड आकारणी करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी सांगितले. त्यासोबतच अनधिकृत पाणी जोडणी आणि अनधिकृतपणे ड्रेनेज लाईन टाकणाऱ्यांकडूनही मोठा आर्थिक दंड वसूल केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे…

कैलास गार्डन, कल्याण (पश्चिम) येथे मल्टिस्‍पेशालीटी हॉस्पिटल प्रस्तावित असून वसंत व्हॅली प्रसुतीगृह बाह्य यंत्रणाद्वारे चालविण्याची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. या सर्वांसाठी महसुली खर्चा अंतर्गत 53.40 कोटी तरतूद…

शक्तीधाम कल्याण (पूर्व) येथे 30 खाटांचे प्रसुतीगृह कार्यान्वित असून शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय डोंबिवली (पश्चिम) येथे प्रत्येकी 10 बेड क्षमतेचे एनआयसीयु आणि पीआयसीयु सुरु…

घनकचरा व्यवस्थापनासाठी 4 पॉवर स्वीपर वाहनांची खरेदी करण्यात आली असून महापालिकेच्या डी ते आय या 7 प्रभाग क्षेत्रातील कचरा संकलन, वाहतुक आणि रस्ते साफसफाईसाठी DBFOT (Design Build Finance Operate Transfer) तत्वावर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम Tipping Fee Model ऐवजी Cost to Service मॉडेलवर निर्धारीत करण्यात आले असून मानांकनाची पूर्तता न झाल्यास ठेकेदाराला दंड आकारण्यात येणार आहे. तर कचरा संकलन आणि वाहतूक कामात गुणवत्ता राखणे शक्य होणार…

महापालिका निधीतून १२ किमीचे १६ रस्ते ६३.५० कोटी आणि एमएमआरडीए निधीमधून ४३ किमीचे ५१ रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार, शहरातील सर्व रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी 30 कोटी निधी उपलब्ध…

Ease of Leaving अंतर्गत सर्व नागरी सुविधा केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात येणार…

महापालिका क्षेत्रातील 65 उद्याने आणि 17 मैदाने यांची निगा, देखभालीसाठी 3 वर्षांसाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली हे. बारावे येथे सुसज्ज ऑटीझम विलेज, किड-झी इ. सुविधा असणाऱ्या उद्यानाचे निर्मिती, मांडा-टिटवाळा (पूर्व) येथे 3 एकर क्षेत्रफळ भूखंडावर हरीतक्षेत्र आणि सुसज्ज उद्यानाची निर्मिती…

महापालिकेच्या जलकुंभावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, महापालिकेच्या १२ इमारतींवर ५८७कि.वॅट ची सौर उर्जा निर्मिती संयंत्रे उभारणे, एनटीपीसीमार्फत “रेस्को” अंतर्गत ४ इमारतींवर ६०० किलोवॅट सौर उर्जा निर्मिती प्रकल्प, महापालिका क्षेत्रात असलेल्या विविध तलावांवर Floating Solar PV यंत्रणा उभारणे प्रस्तावित…

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 4 नागरीक सुविधा केंद्रांच्या बळकटीकरणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहेत. याअंतर्गत सर्व नागरीक सुविधा केंद्रांची एकसारखी अंतर्गत रचना (युनिक थीम) करण्यात येणार…

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत महापालिका क्षेत्रात ९ ठिकाणी अत्याधुनिक “आकांक्षी” शौचालय उभारणेचे कार्यादेश, शौचालयांमध्ये दिव्यांगासाठी तसेच महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था…

महापालिका कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार महिलांकरीता महिला वसतीगृह उभारण्याचे प्रस्तावित असून त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर…

महापालिका शाळांतील व्यवस्थापन आणि शिक्षणात नाविन्यता आणण्यासाठी आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाद्वारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अभ्यासक्रम, “सोलर ऑपरेटेड रोबोटीक्स कोडींग आर्टीफिशियल इंन्टीलीजन्स प्रयोगशाळा” विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार…

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त असण्याचा बहुमान मिळवलेल्या डॉ. इंदू राणी जाखड यांचा आजचा हा दुसरा अर्थसंकल्प होता. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची दिवास्वप्न दाखवण्यात आलेले नसून प्रामाणिक करदात्या नागरिकांना अधिकाधिक चांगल्या नागरी सेवा सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न यातून दिसत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा