कल्याण आयएमएच्या नविन कार्यकारिणीची नियुक्ती
कल्याण दि. 24 एप्रिल :
कोवीडच्या कठीण काळामध्ये कोवीड आर्मीच्या माध्यमातून कल्याण इंडीयन मेडीकल असोसिएशनने (आय एम ए) हिमालयाएवढे काम केल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे यांनी काढले.
निमित्त होते ते कल्याण आयएमएच्या नविन कार्यकारिणीच्या नियुक्ती सोहळ्याचे. आयएमए हॉलमध्ये राज्य आय एम ए अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे, सचिव डॉ. संतोष कदम, मुंबई महापालिकेच्या राजावाडीसह इतर रुग्णालयांच्या अधिक्षिका डॉ. विद्या ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
संघटनेला नेले वेगळ्या उंचीवर…
कोवीडशी यशस्वी लढा देण्यासोबतच कल्याण आयएमएने सामाजिक भान जपत राबवलेल्या विविध उपक्रमांचेही डॉ. कुटे यांच्यासह डॉ. संतोष कदम आणि डॉ. विद्या ठाकूर यांनी विशेष कौतूक केले. तसेच मावळते अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांच्या टीमने ज्याप्रमाणे या संघटनेला एक वेगळी उंची, एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्याचप्रमाणे नविन अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणीही त्याचाच कित्ता गिरवत कल्याण आयएमएसाठी काम करेल असा विश्वासही या मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला.
अशी आहे नविन कार्यकारिणी…
अध्यक्ष : डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, सचिव डॉ. विकास सुरंजे, सह सचिव डॉ. अमित बोटकुंडले, खजिनदार डॉ. हिमांशू ठक्कर यांच्यासह सदस्यपदी डॉ. संदेश रोठे, डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. गणेश शिरसाट, डॉ. स्वाती शेलार, डॉ. ऋतिका भोसले, डॉ. अमित झोपे आदींची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मावळते अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील काहीसे भावूक झालेले पाहायला मिळाले. आपल्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केलेल्या विविध सामाजिक कामांना उजाळा देत नविन कार्यकारिणी यापेक्षा अधिक चांगले काम करेल अशी अपेक्षाही डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.
कल्याण आयएमए हॉलमध्ये झालेल्या या शानदार सोहळ्याला कल्याण दिवाणी वकील संघटनेचे खजिनदार ॲड. जयदीप हजारे, *इनरव्हील क्लबच्या ॲड. निता कदम,* डोंबिवली आयएमए अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी शिंदे , डॉ. अनंत ईटकर, डॉ. संजय गोडबोले, डॉ. विवेक भोसले, डॉ. प्रविण भुजबळ, डॉ. प्रदीपकुमार सांगळे, डॉ. राजेश राजू, डॉ. आश्विन कक्कर, डॉ. प्रशांत खताळे, डॉ. जयेश राठोड, यांच्यासह रोटरी क्लब, निमा, केम्पा आदी डॉक्टर्स संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.