
येत्या 11 फेब्रुवारी रोजी होणार उद्घाटन
कल्याण दि.8फेब्रुवारी :
आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी नावाजले गेलेले कल्याणातील नामांकित द केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आता कल्याण पूर्वेतही सुरू होणार आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी दिमाखदार सोहळ्याच्या माध्यमातून या केंब्रिया किड्स या इंटरनॅशनल प्रीस्कूलचे उद्घाटन केले जाणार आहे.
कल्याण पश्चिमेला असलेल्या केंब्रिया इंटरनॅशनल शाळेने गेल्या दशकभरात शिक्षण क्षेत्रामध्ये आपला चांगला ठसा उमटविला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वोत्तम शिक्षण, मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवले जाणाऱ्या उपक्रमांसाठी ही शाळा सर्वश्रुत आहे. कल्याण पश्चिमेपाठोपाठ आता ही शाळा कल्याण पूर्वेतही दर्जेदार शिक्षणासाठी सज्ज झाली आहे.
येत्या 11 फेब्रुवारी रोजी कल्याण पूर्वेतील मलंगगड मार्गावरील शंकर हाईट्स इमारतीमध्ये ही शाळा सुरू होणार आहे. तसेच या नव्या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्ले ग्रुप, डे केअर आदींसाठी ॲडमिशन प्रक्रियाही सुरू झाली आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क :*
केंब्रिया किड्स, शंकर हाईट्स, साकेत वर्ल्डसमोर, मलंगगड रोड, कल्याण पूर्व
8298-37-8853