
कल्याण दि.3 सप्टेंबर :
येत्या मंगळवारी 7 सप्टेंबर 2021 रोजी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.
बारावे जलशुद्धीकरण केंद्रातविद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.