
कल्याण दि. ३ ऑगस्ट :
येत्या शुक्रवारी ५ ऑगस्ट २०२२ रोजी कल्याण पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार आहे. बारावे येथील जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल दुरुस्ती कामांसाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कामामुळे शुक्रवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कल्याण पूर्व आणि पश्चिमेला पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.