Home ठळक बातम्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेशानी सजणार कल्याण डोंबिवलीतील शाळांच्या भिंती

सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेशानी सजणार कल्याण डोंबिवलीतील शाळांच्या भिंती

 

कल्याण – डोंबिवली दि.23 जानेवारी :
शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आले असून शहर सौंदर्यीकरणासाठी यापुढील पाऊल म्हणून शहरातील शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारी चित्र काढण्यात येत आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन‍ आणि शिक्षण विभागातर्फे अचिव्हर्स महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी, शिक्षक- पालकांच्या सहभागातून साजरी करणे, सर्व प्राथमिक- माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर्शनी भागातील भिंतीवर, शालेय परिसरातील सार्वजनिक भितींवर सार्वजनिक तसेच पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्रण करण्याचा ठराव मंजूर झाला. बैठकीत उपायुक्त कोकरे यांनी कलाकृती बनवण्यासाठी लागणारे रंग, ब्रश आणि इतर सामग्री प्रत्येक शाळेत मोफत देण्यात येईल असे आश्वासन दिले. उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्लॅस्टिक बंदीबाबत शपथ देत कचऱ्याचे वर्गीकरण कशा पध्दतीने करावे याबद्दल सविस्तर महिती देऊन शालेय स्तरावर शुन्य कचरा मोहिम राबविण्यची सुचना केली.

कल्याण तालुका कला अध्यपक संघाचे अध्यक्ष अमोल पाटील, सचिव विनोद शेलकर यांच्यासह चित्रकला शिक्षकांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. या बैठकीला केडीएमसी उपायुक्त रामदास कोकरे, विजय सरकटे, विस्तार अधिकारी कडोंमपा शिक्षण विभाग, अचिवर्स कॉलेज चेअरमन महेश भिवंडीकर सर, राजेश सावंत, राजेश यादव -रोटरी क्लब कल्याणचे चेअरमन, अरुण सपकाळे आणि कल्याण तालुका कला अध्यापक संघाचे सर्व चित्रकला शिक्षक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा