कल्याण डोंबिवली दि.16 मार्च :
उष्णतेच्या लाटेमुळे सलग दुसऱ्या दिवशी कल्याण डोंबिवलीतही तापमानाने चाळीशी ओलांडलेली पाहायला मिळाली. कल्याणमध्ये 42 आणि डोंबिवलीमध्ये 41.8 अंश सेल्सियस इतक्या चढ्या तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात आज बदलापूर 42.2 अंश सेल्सियस पाठोपाठ कल्याण- डोंबिवली आणि भिवंडीत सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले.
उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीसह ठाणे, मुंबईतील तापमान चांगलेच वाढले आहे. हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानूसार कल्याण डोंबिवलीत काल तब्बल 41. 4 अंश सेल्सियस इतक्या मोठ्या तापमानाची नोंद झाली होती. तर आजच्या तापमानामध्ये आज पुन्हा वाढ होऊन कल्याण डोंबिवलीचा पारा 42 अंशापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळाला. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या या तापमानाचा फटका दुपारी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना बसत आहे.
आज नोंदवण्यात आलेले तापमान
कल्याण – 42
डोंबिवली – 41.8
भिवंडी – 42
बदलापूर – 42.2
ठाणे – 41.4
नवी मुंबई – 41.4