Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील तापमानाने पुन्हा ओलांडली चाळीशी; पारा पोहोचला 41 अंशांवर

कल्याण डोंबिवलीतील तापमानाने पुन्हा ओलांडली चाळीशी; पारा पोहोचला 41 अंशांवर

 

कल्याण- डोंबिवली दि.13 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीतील तापमानाने आज पुन्हा एकदा चाळीशीचा आकडा पार केलेला पाहायला मिळाला. कल्याणमध्ये आज तब्बल 41.9 तर डोंबिवलीत 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

गेल्या महिन्याच्या अखेरीस कल्याण डोंबवलीतील पाऱ्याने सर्व विक्रम मोडीत काढत तापमानवाढीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. त्यापाठोपाठ अवघ्या काही आठवड्याच्या कालावधीत आज पुन्हा एकदा तापमानाने मोठी वाढ नोंदवलेली पाहायला मिळाली. कल्याणमध्ये आज 41.9 अंश आणि डोंबिवलीमध्ये कल्याणपेक्षा काही अंशी कमी म्हणजेच 41.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक म्हणाले. तर कल्याण डोंबिवलीप्रमाणे शेजारील शहरांमध्येही तापमान वाढ झाल्याची नोंद झाली आहे.

 

उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि गरम वाऱ्यांमुळे ही तापमान वाढ – अभिजीत मोडक, हवामान अभ्यासक

उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि गरम वाऱ्यांमुळे ही तापमान वाढ झाली आहे. जेव्हा पाश्चिमेकडून वारे येतात तेव्हा ते समुद्रावरून येत असल्याने खाऱ्या वाऱ्यांमुळे घामाघूम वातावरण बनते. परंतु हेच वारे तापमानवाढ रोखण्यात, नियंत्रणात राहण्यास मदत करतात. आणि त्यांच्यामुळे आपल्याकडे सहसा 40 अंश सेल्सियसवर तापमान जात नाही.

परंतु उत्तरेकडून येणाऱ्या पण कोरड्या हवेमुळे घाम येत नसला तरी चटके बसणारे कडक ऊन जाणवते. आणि दुपारची गरम हवा ही लूसारखी अंगाला भाजून काढते. त्यामुळे आपण दुपारी 12 ते 4 दरम्यान रोडवर बस, रिक्षा किवा ट्रेनने प्रवास करत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. या तापमानवाढीबाबत खासगी हवामान अभ्यासकांनी आधीच अंदाज वर्तवला होता. आणि सध्याची परिस्थिती पाहता तो खरा ठरत असल्याचे दिसत आहे.

 

आजचे तापमान

कल्याण – 41.9

डोंबिवली – 41.7

भिवंडी – 41.9

उल्हानगर – 41.7

ठाणे – 40.9

बदलापूर – 41.5

नवी मुंबई – 40.5

कर्जत – 42.6

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा