वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची गरज

     

    डोंबिवली दि.28 फेब्रुवारी :
    डोंबिवलीतील स्व. देवचंद कांबळे फाऊंडेशन आणि अस्तित्व मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वीटभट्टी कामगारांच्या शालाबाह्य मुलांसाठी हसत-खेळत शिक्षण उपक्रम केला जाणार आहे.

    टिटवाळा आणि डोंबिवलीजवळील खोणी येथे काही वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची मुले ही शालाबाह्य आहेत. या शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे संगण्यात आले. तसेच हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी चिमुकली मुले वापरू शकतील अशी जुनी किंवा नवी खेळणी संस्थेच्या कार्यालयात आणून देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

    या उपक्रमात सहभागी होण्यासाठी टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी (शून्य ते सहा या वयोगटातील मुलांना शिकवू शकतील अशा) इच्छुक कार्यकर्त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

    अधिक माहितीसाठी संपर्क
    आर.के.असोसिएटस्, सदनिका क्र. १०३, पहिला मजला, मोरया आर्केड,नैवेद्य पोळी भाजी केंद्राच्यावर, नेरुरकर रोड, डोंबिवली (पू)
    ऍडव्होकेट रेखा कांबळे- 9221284389 / खरात- 9867837759

    Remarkably, General Healthcare changes shows. cialis 20mg price Sub-group purchase viagra online all length regurgitation infections.

    तुमची प्रतिक्रिया लिहा

    तुमची कंमेंट लिहा
    तुमचे नाव लिहा