वर्षाला देशभरात गरज १ लाख नेत्रदात्यांची तर उपलब्धता केवळ २५ हजार
डोंबिवली दि. ७ मे :
भारतात वर्षाला सुमारे १ लाखापर्यंत नेत्रदात्यांची गरज असून त्या तुलनेत केवळ 25 हजारच नेत्र शस्त्रक्रिया होत आहेत. नेत्र शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारे टिश्यू किंवा बुबुळ नेत्र बॅकेत नसल्याने 75 हजार शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. या पार्श्वभमीवर देशभरात नेत्रदानाबाबत जनजागृतीची गरज असल्याचे मत नामांकित एएसजी आय हॉस्पिटल समूहाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. विनायक दामगुडे यांनी व्यक्त केले.
एएसजी समूहाच्या नेत्र रूग्णालयाचे नुकतेच डोंबिवलीत नुकतेच उद्घाघाटन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. विनायक दामगुडे यांनी हे मत व्यक्त केले. प्रत्येकाला सर्वोत्तम नेत्रोपचार मिळावेत तसेच कोणाताही भेदभाव न करता समान उपचार पध्दती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या समूहाची स्थापना करण्यात आली आहे. एएसजी आय समूहाचे देशभरातील 15 राज्यांमधील 38 शहरांमध्ये 44 रुग्णालये कार्यरत आहेत. या पत्रकार परिषदेला डॉ. हरीश पाठक, डॉ. हर्षवर्धन रेड्डी, डॉ. प्रमोद लेंडे हे नेत्रतज्ज्ञही उपस्थित होते.
नेत्रदानाची प्रक्रिया अगदी सोपी आहे. या रुग्णालयात येणा:या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नेत्रदानाविषयी माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी पत्रक देणे, रुग्णालयात फलक लावणे तसेच मौखिक पध्दतीने माहिती दिली जाणार असल्याचेही दामगुडे म्हणाले.
तर नेत्रतज्ज्ञ डॉ. हरिश पाठक यांनी सांगितले की सध्याच्या पिढीला चष्मा लावणे आवडत नाही. त्यांना चांगल दिसायचे आहे. त्यामुळे चष्माचा नंबर काढण्यासाठी तरूण पिढी मोठया प्रमाणावर रुग्णालयात येते. चष्मा काढून टाकण्यासाठी दोन पध्दती असून लेझरच्या साहाय्याने वरच्या वर शस्त्रक्रिया केली जाते. दहा ते पंधरा मिनिटात ही प्रक्रिया केली जाते. फारच कमी लोकांना लेन्स टाकावे लागते. तसेच लेन्समध्येही अनेक ॲडव्हांस लेन्स आल्या असून त्याचाही वापर केला जात असल्याचे डॉ. पाठक म्हणले. तसेच आर्थिक क्षमता नसलेल्या रुग्णांना देखील विशेष पॅकेजमध्ये उपचार करून दिले जातात. लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांची वेळोवेळी नेत्र तपासणी करण्याची गरज आहे. अनेकदा मुलांना चष्मा आहे पण ती गोष्ट त्यांना माहितीच नसते. परदेशात जन्मानंतर लगेचच आणि शाळेत जाण्यापूर्वी देखील नेत्र तपासणी केली जाते. पण आपल्याकडे तसे काही होत नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.